अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया,‘मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळणं हे दु:खद, मी हीच विनंती करु शकते की…’

Amruta fadnavis । मी एवढंच म्हणेन की ही घटना खूप दुःखद आहे. त्यावर उपमुखांनंतरी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. या दुर्घटनेमागचे कारणही पुढे आले आहे. ही हवेचा वेग जास्त असल्यामुळे घडली आहे. यावर पहिली कारवाई करत कंत्राटदारांना धारेवर धरले आहे. असे झालेच कसे असं मी म्हणणार नाही त्यापेक्षा मोठी गोष्टी अशी की आपल्याला पुन्हा एकदा पुतळा तिथे उभारायला पाहिजे मी हीच विनंती करू शकते. अशी प्रतिक्रया प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा कोसल्याच्या घटनेवरुन राजकारण तापले आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून महायुती सरकारवर गंभीर आरोप आणि टीका केली जात आहे. या टीकेवर महायुतीकडून प्रतिउत्तर देण्यात येत आहे.
नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मालवणातील राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत भाष्य करत विरोधकांना सूचना आणि विनंती केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मालवणच्या घटनेवर कुणीच राजकारण करू नये, ही माझी विनंती आहे. महाराजांचा पुतळा कोसळणे ही दुःखद घटना आहे. अशा घटनांची योग्य चौकशी करून कोण दोषी आहेत, हे समोर आले पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याठिकाणी पुन्हा भव्य असा पुतळा उभारला गेला पाहिजे.
आम्ही या तीनही गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले आहे. नौदलाने ही बाब गांभीर्याने घेतली असून चौकशी समिती तयार केली आहे. या समितीने पुतळ्याच्या ठिकाणी पाहणी केली आहे. नौदल यावर उचित कारवाई करेल. जे दोषी असतील त्यांच्याविरोधात कारवाई करेल, अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच, महाराजांचा पुतळा कोसळण्यासाठी नेमकी कोणती घटना जबाबदार होती. त्यात काय चुका राहिल्या, या संदर्भातला अहवाल नौदल देणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानेही पोलिसांत एफआयआर दाखल केलेला आहे. नौदलाच्या अहवालानंतर पुढील कारवाई पोलिसांकडून केली जाईल.
तसेच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे नौदलाच्या मदतीने पुन्हा त्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारला जाईल. ही घटना घडल्यानंतर जे जे करणे आवश्यक आहे, ते केले जात आहे.
तरीही विरोधकांकडून प्रत्येक गोष्टीकडे निवडणुकीच्या चष्म्यातून पाहिले जात आहे. हे अत्यंत चुकीचे असून विरोधकांनी खालच्या पातळीचे राजकारण करू नये, असे आवाहन फडणवीसांकडून करण्यात आले आहे.





