अमृता फडणवीस खंडणी प्रकरणी अटकेत असणाऱ्या अनिल जयसिंघानीची ३.४० कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस खंडणी प्रकरणी अटकेत असणाऱ्या कुप्रसिद्ध क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी याच्यावर ईडीने कडक कारवाई केली आहे. जयसिंघानी याची तब्बल ३.४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अंमल बजावणी संचालनालयाने ही कारवाई केली आहे. PMLA प्रकरणी करण्यात जप्तीची करवाई कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
2015 साली गुजरातच्या वडोदरा येथे दाखल गुन्ह्यात ED ने केला ECIR दाखल केला होता. याप्रकरणी आरोपपत्र देखील दाखल केले होते. अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणी जयसिंघानी आरोपी आहे.
गुजरातमधील वडोदरा पोलीस ठाण्यात 2015 मध्ये नोंदवलेल्या एफआयआरवर ईडीचा गुन्हा दाखल आहे. तपासादरम्यान, जयसिंघानी हा क्रिकेट सट्टेबाजीच्या कटात त्याचा सहभाग होता. या गुन्ह्यातील सह आरोपीच्या मदतीने फसवणुकीच्या माध्यमातून जयसिंघानी याने मोठ्या प्रमाणात पैसे जमा केल्याचे उघड झाले.
जयसिंघानी 2015 पासून ईडीचे समन्स टाळत असून 2015 मध्ये विशेष पीएमएलए कोर्टाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. तसेच तपासात जयसिघांनी सहकार्य करत नव्हता. 8 एप्रिल 2023 रोजी जयसिंघानीला ईडीने अटक केली होती. त्यानंतर अहमदाबादमधील पीएमएलए कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. 9 जून रोजी ईडीने जयसिंघानी यांच्या ओळखीच्या परिसरात छापा टाकला. ईडीने त्याची 3.40 रु. किमतीची स्थावर मालमत्ता शोधून जप्त केली आहे.





