अमरावती – अमरावती पोलिस दलातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सुखद बातमी आली आहे. पोलिस दलातील महिला कर्मचाऱ्यांची आता आठ तासाची ड्युटी केली आहे. तब्बत चार तास ड्युटीमधून कपात केली आहे.
हा महत्वाचा निर्णय अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी घेतला आहे. या आधी नागपूर पोलिस व पुणे पोलिसांनाकडून हा निर्णय घेण्यात आला होता.
या नवीन निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे, यात अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील 275 महिला पोलीस अंमलदारांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
पोलीस विभागाने महिलांच्या बारा तासाच्या ड्युटीच्या आता आठ तास केला आहे. त्यामुळे आता महिलांना चार तासाची सवलत मिळाल्याने महिला कर्मचाऱ्यांमध्ये मोठा आनंद निर्माण झाला आहे.
महिलांना आपल्या कामाव्यतिरीक्त कौटुबिंक जबाबदाऱ्या सुद्धा पार पाडाव्या लागतात. मात्र पोलिस दलात 12 तास काम करावे लागते. कधी-कधी त्यापेक्षाही काम करण्याची महिलांना वेळ येते. याचा परिणाम कौटुंबिक जबाबदारीवर होत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.