पुणे – पन्नास लाखांच्या पुढील ज्या थकबाकीदारांनी थकबाकीची रक्कम भरलेली नाही, अशांवर पालिकेकडून कायदेशीर कारवाई करण्यास सुरवात झाल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, अभय योजना सुरू झाल्यापासून केवळ 34 दिवसांत पालिकेकडे विक्रमी मिळकतकर जमा झाल्याची माहिती देण्यात आली.
2 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरदरम्यानच्या काळात 55 हजार 933 मिळकतधारकांनी 136 कोटी 62 लाखांचा मिळकतकर जमा केला.
पुणे महापालिकेत सुमारे 10 लाख मिळकती असून अनेक मिळकतधारकांनी वेळेवर मिळकतकर न भारल्याने महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार 2 टक्के शास्ती लावण्यात आला. परिणामी थकबाकीची रक्कम मोठ्या प्रमाणावर वाढली.