BCCI : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी ‘अमोल मुजुमदार’ यांची नियुक्ती

नवी दिल्ली :- भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी मुंबईचा माजी रणजीपटू अमोल मुजूमदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हॅंडलवरून बुधवारी ही घोषणा केली. सुलक्षणा नाईल, अशोक मल्होत्रा व जतिन परांजपे यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने मुजूमदार यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतर बीसीसीआयने त्यावर शिक्कामोर्तब केले.
मुजुमदार यांनी मुंबई तसेच आंध्र प्रदेश व आसामकडून रणजी स्पर्धेत खेळताना एकूण 171 प्रथम दर्जाच्या सामन्यांत 11 हजारपेक्षा जास्त धावा केल्या असून त्यात 30 शतकांचा समावेश आहे.
🚨 NEWS 🚨
Mr Amol Muzumdar Appointed as Head Coach – Team India (Senior Women).
Details 🔽https://t.co/6y0TiQ2prF
— BCCI Women (@BCCIWomen) October 25, 2023
अमोल मजुमदारने 21 वर्षांच्या आपल्या शानदार कारकिर्दीत 171 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 30 शतकांच्या मदतीने 11 हजारांहून अधिक धावा केल्या. त्यांनी 100 हून अधिक लिस्ट ए गेम्स आणि 14 टी-20 सामनेही खेळले आहेत. त्यांनी मुंबईसह अनेक रणजी विजेतेपद जिंकले आणि नंतर आसाम आणि आंध्र प्रदेशचे प्रतिनिधित्व केले.





