T20 World Cup 2024 : MCA अध्यक्ष अमोल काळेंचे न्यूयॉर्कमध्ये निधन, IND vs PAK सामन्यानंतर हृदयविकाराचा झटका…

MCA President Amol Kale Passes Away : टी-20 विश्वचषक 2024 मध्ये रविवारी (9 जून) भारतीय संघ आणि पाकिस्तान यांच्यात एक अतिशय रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 6 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. पण या सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेटसाठी एक वाईट बातमीही समोर आली आहे.
हा सामना पाहण्यासाठी अमेरिकेत आलेले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांचे वयाच्या 47 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी स्टेडियममध्ये बसून हा सामना पाहिला, मात्र सामन्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे अवघ्या ४७ व्या वर्षी दुःखद निधन. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.#mumbaicricketassociation #mca #cricket #amolkale @MumbaiCricAssoc pic.twitter.com/UUDAppdRAG
— Maharashtra Cricket Association (@MahaCricket) June 10, 2024
रविवारी, काळे हे सचिव अजिंक्य नाईक आणि सर्वोच्च परिषद सदस्य सूरज सामत यांच्यासह इतर एमसीए अधिकारी सामना पाहण्यासाठी नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियमवर उपस्थित होते.
भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांना पराभूत करून मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेले अमोल काळे यांचं नाव क्रीडा विश्वातसह राजकीय वर्तुळातही चर्चेत आले होते. अमोल काळे यांचे क्रिकेटशी गहिरे नाते आहे. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची असलेली मैत्री हीदेखील सर्वश्रुत आहे. आज त्याच अमोल काळे यांच्या निधनाचे वृत्त आले आहे.
T20 World Cup 2024 : बुमराह ठरला गेमचेंजर..! थरारक सामन्यात टीम इंडियाचा पाकवर 6 धावांनी विजय…
आगामी 2024-25 हंगामासाठी रेड बॉल फॉरमॅटमध्ये बीसीसीआयच्या सर्व खेळाडूंसाठी मॅच फी समतल करण्यासह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय त्यांच्या कार्यकाळात घेतले. एमसीएने रणजी करंडक विजेत्या संघासाठी 5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ही रक्कम बीसीसीआयच्या बक्षीस रकमेपेक्षाही जास्त आहे. त्यावेळी एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांनी घोषणा करताना म्हटले होते की, रणजी करंडक खेळणाऱ्या खेळाडूंचे उत्पन्न चांगले असावे. मुंबईत रणजी ट्रॉफी आणि लाल बॉल क्रिकेटचे स्वतःचे महत्त्व आहे.





