Amitabh bachchan: फिल्मफेअर पुरस्कारानंतर अमिताभ बच्चन यांची पोस्ट; ऐश्वर्या रायचा उल्लेख नसल्याने नेटकऱ्यांचा सवाल

Amitabh bachchan : अभिषेक बच्चनला नुकताच ‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारताना तो खूप भावूक झाला होता. त्या सोहळ्यात जया बच्चन आणि त्याची बहीण श्वेता बच्चन हजर होत्या. अभिषेकने मंचावरून आपल्या पत्नी ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्या यांचे आभार मानले.
यानंतर अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ पोस्ट करत मुलाला शुभेच्छा दिल्या. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं,
“एकाच कुटुंबातील तीन सदस्य मी, जया आणि अभिषेक या तिघांना एकाच दिवशी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. जया आणि मला ‘सिने आयकॉन’ पुरस्कार मिळाला, तर अभिषेकला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून गौरवण्यात आलं. हा आमच्या कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण आहे. प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार.”
View this post on Instagram
या पोस्टवर अनेकांनी अमिताभ बच्चन यांचं कौतुक केलं, शुभेच्छा दिल्या आणि लिहिलं, “तुम्ही या देशाचा अभिमान आहात”, “तुम्हाला मेहनतीचं फळ मिळालं”, असं सांगून भरपूर हार्ट इमोजी शेअर केल्या.
मात्र काही नेटकरी मात्र ऐश्वर्या राय बच्चन च्या अनुपस्थितीकडे लक्ष वेधत होते. अनेकांनी कमेंटमध्ये विचारलं, “ऐश्वर्या कुठे आहे?”
“अमिताभजी, तुम्ही तुमच्या सुनेचा उल्लेख का केला नाही?” “ती तुमच्या कुटुंबाचा भाग नाही का?”
“ऐश्वर्यानेही दोनदा फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत, तिचं नाव का नाही घेतलं?”
या कमेंट्समुळे सोशल मीडियावर बच्चन कुटुंबाबद्दल पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
दरम्यान, ऐश्वर्या राय बच्चन यांना याआधी दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत, पण या वर्षी त्यांना कोणताही पुरस्कार मिळाला नाही. सध्या अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोचे सूत्रसंचालन करत आहेत.





