बॉलीवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत काम करणार आहे. बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्यासोबत तो “मे डे’ हा चित्रपट साकारणार आहे. या चित्रपटात अजय देवगण देखील निर्णायक भूमिका साकारणार आहे.
यात तो एका पायलेटच्या भूमिकेत दिसणार आहे. “मे डे’ चित्रपटाचे शूटिंग वर्षाअखेर डिसेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. तेव्हा या चित्रपटातील अन्य स्टार कास्ट निश्चित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे पहिल्या शेड्यूलमध्ये हैद्राबादमध्ये शूट करण्यात येणार आहे. अजय देवगण आणि अमिताभ बच्चन तब्बल 7 वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्रित काम करणार आहे.
यापूर्वी ही जोडी “मेजर साब’, “खाकी’ आणि “सत्याग्रह’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला कमविला होता. दरम्यान, “मे डे’ चित्रपटाला अजय देवगण स्वतः प्रोड्यूस करणार आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. दीर्घ काळानंतर या जोडीला पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.