Shiv Sena : काल २ डिसेंबर २०२५ रोजी राज्यातील नगरपरिषदा नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानावेळी काही मतदान केंद्रावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. दुपारनंतर मतदारांची लांबच लांब रांगा मतदान केंद्रावर लागल्याचे पाहायला मिळाले. काही मतदान केंद्रांचा अपवाद वगळता मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. काही मतदान केंद्राबाहेर दोन गटात तुफान राडा झाला तर काही ठिकाणी पोलिस आणि मतदार यांच्यात बाचाबाची झाली. यासंबंधीतील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याच दिवशी एक मोठी राजकीय घडामोड घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचेच प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या ठाणे बालेकिल्ल्यातच ही मोठी घडामोडी घडली आहे. पूर्व कोपरी मतदार संघात मोठा धक्का गेल्या काही दिवसांपासून भाजप-शिवसेना (शिंदे) यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. ठाणे जिल्ह्यातील अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपने पक्षात स्थान दिले आहे. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एकनाथ शिंदे यांना त्यांच्या ठाणे जिल्ह्यातील पूर्व कोपरी मतदार संघात मोठा धक्का दिला आहे. मातोश्रीवर शिवबंधन ज्येष्ठ शिवसैनिकांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही, असा आरोप करत गेल्या २० ते २२ वर्षांपासून उपशाखाप्रमुख असलेले व विद्यमान उपविभाग प्रमुख आबा मोरे यांच्यासह तब्बल २०० ते ३०० शिवसैनिकांनी मंगळवारी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मातोश्रीवर शिवबंधन बांधत आपल्या हाती मशाल घेतली आहे. मोरे हे माजी सभागृह नेते पांडुरंग पाटील यांचे खांदे समर्थक मानले जातात. त्यांच्या पक्ष प्रावेशामुळे कोपरीतील राजकीय वातावरण बदलले जाणार असल्याची चर्चा आहे. शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांकडून, स्थानिक माजी नगरसेवकांकडून मिळत असलेले दुय्यम स्थान, यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. हेही वाचा : खोपोलीत मतदानाचा उत्साह; आता लक्ष निकालाकडे…