अमेरिकन बॅडमिंटन स्पर्धा : प्रणोय व सौरभ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

फुलर्टन (अमेरिका) – भारताच्या एच.एस.प्रणोय व सौरभ वर्मा यांनी अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आगेकूच राखली. उपांत्यपूर्व फेरीत याच दोन खेळाडूंमध्ये लढत होणार आहे.

द्वितीय मानांकित प्रणोयने दक्षिण कोरियाच्या क्वांग हेईहो याच्यावर 21-16, 18-21, 21-16 असा विजय मिळविला. त्याने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्‍यांचा बहारदार खेळ केला. तसेच त्याने सर्व्हिसवरही चांगले नियंत्रण राखले होते. सौरभ यालाही भारताचा युवा खेळाडू लक्ष्य सेन याच्याविरुद्ध विजय मिळविताना झगडावे लागले.

त्याने हा सामना 21-11, 19-21, 21-12 असा जिंकला. त्याने कॉर्नरजवळ प्लेसिंगचा सुरेख ख़ेळ करीत हा सामना जिंकला. लक्ष्यने दुसऱ्या गेममध्ये चिवट लढत दिली. मात्र, शेवटच्या गेममध्ये त्याला परतीच्या फटक्‍यांवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याचा फायदा घेत सौरभने ही गेम घेतली आणि विजयश्री खेचून आणली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.