‘रशिया-युक्रेन युद्ध पीएम मोदीच थांबवू शकतात’ अमेरिकेचे मोठे वक्तव्य

जेव्हा पंतप्रधान मोदी रशियाला राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना भेटायला गेले तेव्हा अमेरिकेने चिंता व्यक्त केली होती. मात्र आता अमेरिकेने भारताची ताकद ओळखली आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध केवळ भारतच थांबवू शकतो.असा विश्वास अमेरिकेने व्यक्त केला आहे.
युक्रेन – रशिया युद्ध संपवण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, हे अमेरिकेने मान्य केले. अमेरिकेने बुधवारी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ‘भारतामध्ये व्लादिमीर पुतिन यांना युद्ध संपवण्यासाठी पटवून देण्याची क्षमता आहे. मोदींच्या दोन दिवसीय रशिया दौऱ्यानंतर अमेरिकेने हे वक्तव्य केले आहे.’
व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरेन जीन-पियरे नेमक्या काय म्हणाल्या…
आम्हाला विश्वास आहे की, भारत आणि रशियाचे चांगले संबंध बघता, भारत राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी समजू शकेल. युक्रेनसोबतचे युद्ध संपवण्याचे काम अध्यक्ष पुतिन यांचे आहे. पुतिन यांनी युद्ध सुरू केले आणि तेच हे युद्ध संपवू शकतात.
पुतीनला मिठी मारल्यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष संतापले…
जेव्हा पीएम मोदींनी पुतीन यांना मिठी मारली तेव्हा झेलेन्स्की यांनी टीका केली. शांततेच्या प्रयत्नांसाठी हा मोठा धक्का असल्याचे त्यांनी म्हटले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी पुतीन यांना खुनी म्हटले होते.ते म्हणाले की, जेव्हा पंतप्रधान मोदी पुतीन यांची भेट घेत होते, तेव्हा रशियन क्षेपणास्त्रे युक्रेनवर हल्ला करत होती. रशियाने कीवमधील मुलांच्या रुग्णालयाला लक्ष्य केले होते. मोदींनी सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सोमवारी सकाळी रशियन क्षेपणास्त्रांनी युक्रेनच्या शहरांवर हल्ला केला.
पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त केली
मंगळवारी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान पीएम मोदींनी युक्रेनमधील २९ महिने चाललेले युद्ध आणि त्यात मारल्या गेलेल्या लोकांबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी निष्पाप मुलांच्या मृत्यूचा उल्लेख केला होता. निष्पाप मुलांच्या हत्येने त्यांचे हृदय दुखते, असे पंतप्रधान म्हणाले. ज्या दिवशी पंतप्रधान पुतीन यांना रशियात भेटले त्याच दिवशी युक्रेनवर हल्ला झाला. यात 37 जणांचा मृत्यू झाला असून 170 जण जखमी झाले आहेत.





