पुणे,- आषाढी वारीत अत्यवस्थ, जखमी वारकऱ्यांना तत्काळ उपचार मिळवून देण्यात “बीव्हीजी-मेम्स’ यांच्या रुग्णवाहिका आणि कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यातही बीव्हीजी ग्रुपच्या वतीने 108 हेल्पलाइन क्रमांकावरील 75 रुग्णवाहिका सेवा कार्यान्वित असतील.
तसेच श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यांसह अन्य पालख्यांबरोबर ही रुग्णवाहिका सेवा असणार आहे. ग्रुपचे प्रमुख हणमंतराव गायकवाड आणि डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पालखी सोहळ्यात तब्बल 4,529 जणांना या सेवेचा उपयोग झाला आहे.