महाकुंभमधील चेंगराचेंगरीनंतर रुग्णावाहिकेलाच लागली आग; व्हिडिओ आला समोर

Mahakumbh Stampede । उत्तर प्रदेशातील महाकुंभ येथील संगम घाटावर मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अनेकांनी जीव गमावला. तर काही नागरिक जखमी झाले आहे. जखमींना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र चेंगराचेंगरीच्या या घटनेनंतर रुग्णांच्या सेवेकरता कार्यरत असलेल्या एका रुग्णावाहिकेलाच आज आग लागल्याचीही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
रुग्णवाहिकेच्या चालकाच्या केबिनमध्ये ही आग लागली. आग विझवण्याचा प्रयत्न होत असल्याचं व्हिडिओतून दिसत आहे. ही घटना कळताच प्रशासकीय अधिकारी आणि अग्निशमन ब्रिगेड टीम घटनास्थळी पोहोचली. अग्निशमन दलाच्या पथकाने रुग्णवाहिकेच्या परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. परंतु आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु तपास केला जात आहे. यात रुग्णवाहिकेचे नुकसान झाले आहे, परंतु या घटनेत कोणत्याही व्यक्तीला गंभीर दुखापत किंवा नुकसान झालेले नाही. Mahakumbh Stampede ।
VIDEO | Maha Kumbh 2025: An Ambulance reportedly catches fire in Kumbh area. Visuals show people using fire extinguishers to douse the flames. Further details awaited.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7)#MahaKumbh2025 #MahaKumbhWithPTI pic.twitter.com/tlYEqKWp2e
— Press Trust of India (@PTI_News) January 29, 2025
संगम घाटावर मोठ्या प्रमाणात भाविक एकत्र आल्याने चेंगराचेंगरी झाली. रात्री १ ते दोन वाजताच्या दरम्यान आखाडा मार्गावर अमृत स्नानासाठी भाविक जमले होते. तेथे बॅरिकेट्स लावण्यात आले होते, त्यावेळी बॅरिकेट्स निघाल्याने भाविक गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. Mahakumbh Stampede ।
चेंगराचेंगरीमुळे अमृत स्नान रद्द
मौनी अमावस्येनिमित्त, मोठ्या संख्येने भाविक प्रयागराज महाकुंभात स्नानासाठी पोहोचले होते. यादरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली, ज्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी, आखाड्यांनी अमृत स्नान कार्यक्रम पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता कोणताही आखाडा आज अमृत स्नान करणार नाही आणि सर्व आखाड्यांनीही त्यांच्या मिरवणुका छावण्यांकडे परत बोलावल्या आहेत. स्थानिक प्रशासन आणि धार्मिक संघटनांनी भाविकांना संयम राखण्याचा आणि संगमावर जाण्याऐवजी जवळच्या घाटांवर स्नान करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे कोणताही अनुचित प्रकार टाळता येईल.





