आंबेगाव, दळवीनगर परिसर ‘राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसमय’
Updated On:

आंबेगाव बुद्रुक – राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाच्या आंबेगाव पठार व दळवीनगर शाखेचे उद्घाटन पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष किशोर कांबळे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमामुळे प्रभाग क्र. 54, 55, 58 आणि संपूर्ण आंबेगाव परिसर राष्ट्रवादीमय झाला होता. या शाखेचे आयोजन स्थानिक नगरसेवक युवराज बेलदरे, उपाध्यक्ष मंदार गोरेगावकर, शाखेचे सरचिटणीस मंगेश साळुंके यांच्यामार्फत करण्यात आले, तर शाखा अध्यक्ष अमोल दराडे, उपाध्यक्ष मयूर जरांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे, नगरसेविका स्मिता कोंढरे, आश्विनी भागवत, संतोष फरांदे, अनिल कोंढरे, दीपक बेलदरे, नंदकुमार देवगिरीकर, सचिन दांगट, सोमनाथ शेडगे, भरत बाबर, चेतन मांगडे आदी उपस्थित होते.





