मंचर-आंबेगाव तालुक्यात करोना रुग्णसंख्येने द्विशतक ओलांडले आहे. तालुक्यात गुरुवारी (दि. 23) 11 करोना बाधित रुग्ण आढळून आले. आता करोना बाधितांची संख्या 210 झाली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली.
तालुक्यात अवसरी खुर्द येथे 4, अवसरी बुद्रुक 3, गावडेवाडी 2, पारगाव 2, पेठ 1, मंचर येथे 3, मेंगडेवाडी 3, महाळुंगे 3 याप्रमाणे 22 रुग्ण आढळले. यामुळे तालुक्यातील कोरोना बाधित संख्या दोनशे दहा झाली आहे.
प्रशासनाने संबंधित गावांमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे. जे रुग्ण नव्याने आढळले. त्यांच्या संपर्कात कोण कोण आले. त्यांचा शोध प्रशासनाने घेण्यास सुरुवात केली आहे. काही संशयितांचा स्वॅब घेण्यास आरोग्य खात्याने घेण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 100 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 105 जणांवर उपचार सुरु आहेत, असे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी सांगितले.