Ambadas Danve Post : पुण्यातील मुंढवा आणि नंतर कोरेगाव पार्कजमीन गैरव्यवहार प्रकरणाने राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते. अखेर काल ३ डिसेंबर रोजी गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जमीन गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य सुत्रधार शीतल तेजवानीला अटक केली आहे. आज शीतल यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या जमीन प्रकरणात ही एक मोठी कारवाई झाली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे नाव समोर आले होते. १८०० कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली. जमीन खरेदी करण्यासाठी स्टॅप ड्युटीसाठी भरलेल्या पैसांवरून मोठा प्रश्न निर्माण झाला होता. चहूबाजूंनी पार्थ पवार यांच्यावर टीका करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागमी त्यांनी केली होती. या प्रकरणासंदर्भात दमानिया यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील भेट घेत पुरावे सादरे केले होते. गेल्या काही दिवसांपासून जमीन प्रकरणातील गायब असलेली मुख्य सुत्रधार शीतल तेजवानी पोलिसांनी मिळाली असल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मधल्या काळात तर शीतल तेजवानी देश सोडून पळून गेल्याची देखील चर्चा झाली होती. पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला ‘अखेर’ अटक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी, या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे.. १. जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही? २. पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर… — Ambadas Danve (@iambadasdanve) December 4, 2025 गुन्हे शाखेच्या पोलिसांना चौकशीत मोठी माहिती मिळाली असून, त्यानुसार शीतल तेजवानी यांच्यावर कारवाई करत अटक केली आहे. शीतल यांच्या अटकेनंतर पार्थ पवार यांच्या अडचणी अधिक वाढणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच त्यांचे धाकटे बंधू जय पवार यांच्या लग्नाची परदेशातील बहिनरीला जय्यत तयारी करण्यात आली आहे, लग्नाच्या धामधूमीत सर्वजण व्यस्त आहेत. अंबादास दानवे ट्वीटमध्ये काय म्हणाले? या संपूर्ण प्रकरणावर आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते माजी विधानपरिषद सदस्य अंबादास दानवे एक्सवरून पोस्ट करत चार मोठे सवाल सरकारला केले आहेत. पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला ‘अखेर’ अटक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी, या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. १. जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही? २. पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर देण्यासाठी अजून किती दिवस ‘मुदतवाढ-मुदतवाढ’ खेळणार आहात? ३. अमेडिया कंपनीत केवळ १ टक्का भागधारक दिग्विजय हा ९९ टक्के भागधारक असलेल्या पार्थ पवारांच्या मर्जीशिवाय सायनिंग अथॉरिटी झाला का? ४. मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सरकार कधी जाहीर करणार? ही शुल्क माफी राजकीय दबावाशिवाय होणे शक्य नाही महोदय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याची कल्पना नाही असे सांगणे, हे जनतेला शुद्ध वेडे बनवणे आहे. ते ही बहुमताच्या जोरावर! असे देखील अंबादान दानवे पोस्टमध्ये म्हणाले आहेत. पार्थ पवार यांच्या अडचणी वाढणार? मुंढवा जमीन प्रकरणात अमेडिया कंपनीचे एक टक्का भागीदार असलेले द्विगविजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर इतरही सहआरोपींवर कारवाई झाली आहे. शीतल तेजवानी हिला देखील पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, ९९ टक्के मालक असलेले पार्थ पवार यांच्यावर कोणतीही कारवाई अद्यापर्यंत झालेली नाही. केवळ हा व्यवहार रद्द झाला असे सांगून मुद्रांक शुल्कापोटी 42 कोटी भरण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून, रक्कम भरण्यासाठी सारखी मुदतवाढ देण्यात येत आहे. यामुळे विरोधक संतप्त झाले आहेत. हेही वाचा : व्लादिमीर पुतिन यांच्या दौऱ्यासाठी दिल्लीत कडेकोट बंदोबस्त ; ठिकठिकाणी सैनिक तैनात, वाहतूक मार्गात बदल