Ambadas Danve : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांना अज्ञात व्यक्तीने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी रविवारी मध्यरात्री २ च्या सुमारास फोनवरून अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी खबरदारी म्हणून पोलिसांनी दानवेंच्या घराबाहेर बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच ही धमकी कुणी दिली? याचा तपासही सुरू केला आहे. फोन कॉल कोणत्या क्रमांकावरून आला? तो कुठून करण्यात आला? व त्यामागे कुणाचा हात असू शकतो? अशा विविध प्रश्नांचा माग पोलिस काढण्याचा प्रयत्न करत आहे. याकामी सायबर सेलचीही मदत घेण्यात येत असल्याची माहिती आहे.