Amazon Sale : ॲमेझॉन सेलमध्ये स्वस्तात मिळताय ‘हे’ 5 स्मार्टफोन; जाणून घ्या

मुंबई : तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ख्रिसमसच्या खास मुहूर्तावर ॲमेझॉनने तुमच्यासाठी एक खास सेल ठेवला आहे. जिथे सध्या अनेक स्मार्टफोन्सवर सर्वात मोठ्या डील्स पाहायला मिळत आहेत. ई-कॉमर्स कंपनीने आजपासून म्हणजेच 25 डिसेंबरपासून Amazon हॉलिडे फोन फेस्ट सेल सुरू केला आहे. हा सेल 2 जानेवारीपर्यंत असणार आहे. आज आपण या सेलमधील टॉप स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊया…
Samsung Galaxy S23 Ultra 5G
सॅमसंगचा Galaxy S23 Ultra 5G हा स्मार्टफोन या सेलमध्ये अर्ध्या किमतीमध्ये उपलब्ध असणार आहे. 1.5 लाख रुपये किमतीचा हा फोन या डीलमध्ये फक्त 72,999 रुपयांना मिळणार आहे. या फोनवर 22,800 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंट देखील उपलब्ध आहे.
OnePlus Nord CE4
या सेलमध्ये Oneplus Nord CE4 हा स्मार्टफोनदेखील उपलब्ध आहे. तुम्ही हा फोन केवळ 22,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. या फोनवर एक विशेष एक्सचेंज डील देखील उपलब्ध आहे.
realme narzo 70x 5g
realme NARZO 70x 5G देखील अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहे. कंपनीने हा फोन 17,999 रुपयांना लॉन्च केला होता पण आता सेलमध्ये तुम्ही हा फोन 12,998 रुपयांमध्ये घेऊ शकणार आहेत.
iQOO 13 5G
नुकताच लॉन्च झालेला iQOO चा सर्वात शक्तिशाली फोन देखील Amazon च्या सेलमध्ये स्वस्तात उपलब्ध आहे. कंपनीने हा फोन 61,999 रुपयांना सादर केला होता पण आता तुम्ही फक्त 54,999 रुपयांमध्ये हा फोन घरी आणू शकता.
Redmi Note 14 5G
Redmi’s Note 14 5G देखील सेलमध्ये अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहे. कंपनीने हा फोन 21,999 रुपयांना लॉन्च केला होता. परंतु आता तुम्ही तो फक्त 18,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. हा फोन तुम्ही EMI वर देखील खरेदी करू शकता.





