43 इंच स्मार्ट टीव्ही फक्त 15 हजारांच्या बजेटमध्ये, या जबरदस्त ऑफर्सविषयी जाणून घ्याच

Smart TV Offers: घरामध्ये मोठ्या स्क्रीनसह येणारा स्मार्ट टीव्ही असावा, असे प्रत्येकाला वाटते. मात्र, अनेकजण जास्त किंमत असल्याने टीव्ही खरेदी करणे टाळतात. मात्र, तुम्ही अवघ्या 15 हजारांच्या बजेटमध्ये 43 इंच स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. ई-कॉमर्स साइट अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेलमध्ये तुम्ही 43 इंच स्मार्ट टीव्ही 15 हजार रुपयात खरेदी करू शकता. या स्मार्ट टीव्हींविषयी जाणून घेऊयात.
Foxsky 43 inch Full HD Smart LED TV
अॅमेझॉनवर सुरू असलेल्या रिपब्लिक डे सेलमध्ये तुम्ही या टीव्हीला खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. या टीव्हीची मूळ किंमत 41,999 रुपये आहे. मात्र, तुम्ही फक्त 12,999 रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय, तुम्हाला टीव्ही खरेदीवर कॅशबॅक ऑफरचाही फायदा मिळेल. हा टीव्ही अँड्राइड ओएसवर काम करतो. यात 30वॉट साउंड आउटपूटचा सपोर्ट मिळेल. याशिवाय, नेटफ्लिक्स, प्राइम व्हीडिओ, झी5, इरोज नाउ, जिओ सिनेमा, सोनीलिव्ह, यूट्यूब, हंगामा, हॉटस्टार अॅपचाही सपोर्ट मिळेल.
Daiwa 43 inch Full HD TV
फ्रेमलेस डिजाइन आणि 20W क्षमतेच्या ड्युअल स्पीकर्ससह येणारा हा टीव्ही फ्लिपकार्ट सेलमध्ये 13,999 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. याशिवाय, ठराविक बँक कार्ड्सवर ऑफरचाही फायदा मिळेल. यामध्ये आय कन्फर्ट मोडसह 5 साउंड मोड्स, 7 पिक्चर मोड्स देण्यात आले आहे. या 43 इंच स्क्रीनसह येणाऱ्या टीव्हीचे रिझॉल्यूशन 1920 X 1080 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आहे.
Dyanora Sigma 43 inch Full HD Smart TV
Dyanora चा 43 इंच टीव्ही फक्त 14,599 रुपयात उपलब्ध आहे. या टीव्हीला खरेदी करताना एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर केल्यास अतिरिक्त 1500 रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळेल. यात 30 वॉट क्षमतेसह येणारे पॉवरफुल ड्युअल स्पीकर्स दिले असून, हा टीव्ही Coolita ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यामध्ये 2 HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट, 1 हेडफोन जॅक दिले आहे.





