अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित; ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

Amarnath Yatra 2024| अमरनाथ यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. यंदाही 29 जून रोजीपासून सुरू झालेल्या या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत. मात्र या यात्रेदरम्यान एक माहिती समोर आली आहे.
मान्सूनच्या आगमनानंतर जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. अमरनाथ यात्रेवरही पावसाचा परिणाम झाला आहे. पहलगाममध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांवरून पवित्र गुहेपर्यंत जाण्यासाठी तात्पुरती थांबवण्यात आली आहे.
पहिल्याच आठवड्यात रेकॉर्डब्रेक भाविकांनी घेतले दर्शन
मात्र हवामानात सुधारणा होताच हा प्रवास पुन्हा सुरू केला जाईल. यासाठी भाविकांना दर्शनासाठी काही वेळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. यात्रेच्या पहिल्याच आठवड्यात रेकॉर्डब्रेक भाविकांनी हजेरी लावली होती. आत्तापर्यंत जवळपास दीड लाख भाविकांनी बाबा बर्फानींचे दर्शन घेतले आहे. 2023 साली तीर्थयात्रेच्या 10 व्या दिवशी भाविकांचा एक लाखांचा आकडा पार झाला होता. Amarnath Yatra 2024|
ही यात्रा 19 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. भाविकांच्या सुरक्षेचा विचार करून यात्रा काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. हवामानात सुधारणा होताच अमरनाथ यात्रा पुन्हा एकदा सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. Amarnath Yatra 2024|
एका प्रशासनिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देश आणि जगातील विभिन्न भागातून एकूण 30,586 भाविकांनी यात्रेच्या पाचव्या दिवशी अमरनाथ बाबाचे दर्शन घेतले. 3 जुलै रोजी बालटाल आणि नुनवान-पहलगामच्या मार्गे भगवान शिव यांच्या पवित्र गुफेत पूजा-अर्चना करण्यात आली.
हेही वाचा:
रवींद्र वायकरांना क्लीनचिट मिळाल्यानंतर संजय राऊत म्हणाले,”आता फक्त दाऊद इब्राहिमलाच…”





