Sukumar and Allu Aravind : अल्लू अर्जूनच्या वडिलांचं चॅलेंज हारले; पुष्पाच्या दिग्दर्शकाने शेअर केला चेकचा फोटो, नेमकं घडलं काय?
Sukumar and Allu Aravind : महाराष्ट्रात चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळत मिळाला नसली तरी सध्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनपेक्षा निर्माते अल्लू अरविंद आणि दिग्दर्शक सुकुमार यांच्यातील एका पैजेची अधिक चर्चा रंगली आहे.

Sukumar and Allu Aravind : ‘आकाशम लो ओका तारा’ या दाक्षिणात्य चित्रपटाची सध्या मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. २० नोव्हेंबर रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या नऊ दिवसांत जगभरात ५१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. महाराष्ट्रात चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळत मिळाला नसली तरी सध्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनपेक्षा निर्माते अल्लू अरविंद आणि दिग्दर्शक सुकुमार यांच्यातील एका पैजेची अधिक चर्चा रंगली आहे.
अल्लू अर्जुनचे वडील आणि प्रसिद्ध निर्माते अल्लू अरविंद यांनी ‘पुष्पा’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांच्यासोबत एक अनोखी पैज लावली होती. दुल्कर सलमान आणि सात्विका वीरवल्ली यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘आकाशम लो ओका तारा’ हा चित्रपट सुकुमार यांनी न रडता पाहून दाखवावा, अशी ही पैज होती.
सुकुमार यांनी ही पैज जिंकल्यास त्यांना एक कोटी रुपये देण्याचे आश्वासन अल्लू अरविंद यांनी दिले होते. जर सुकुमार हे पैज हारले तर त्यांनी १ लाख रुपये अल्लू अरविंद यांना दिण्याचे ठरले होते.चित्रपट पाहताना सुकुमार यांना भावना अनावर झाल्या आणि ते भावूक झाले. त्यामुळे ते ही पैज हारले आहेत. सुकुमार यांनी सोशल मीडियावर एका चेकचा फोटो शेअर करत या पैजेची माहिती दिली. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रात या अनोख्या पैजेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
काय आहे ‘आकाशम लो ओका तारा’ची कथा?
या चित्रपटाची कथा कल्पना नावाच्या एका तरुणीभोवती फिरते. तिला अंतराळवीर बनण्याचे स्वप्न असते. मात्र, परिस्थितीमुळे तिच्यावर एका मध्यमवर्गीय मेकॅनिकशी लग्न करण्याची वेळ येते. यामुळे तिच्या स्वप्नांसमोर अनेक आव्हाने उभी राहतात. मात्र, तिचा पती तिच्या स्वप्नांना समजून घेतो आणि ती पूर्ण करण्यासाठी तिला साथ देतो. एका तरुणीच्या स्वप्नांचा आणि संघर्षाचा भावनिक प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.
दिग्गज कलाकारांची फळी
पवन सादिनेनी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दुल्कर सलमान आणि नवोदित अभिनेत्री सात्विका वीरवल्ली मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय अभिनेत्री श्रुती हासननेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. संदीप गुणन आणि रम्या गुणन यांनी ‘लाइटबॉक्स मीडिया’ या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली आहे.


