हाथरस – हाथरसमधील दलित मुलीवरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी आता पूर्ण झाली असून तेथील प्रशासनाने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना त्या गावात घातलेली बंदी मागे घेतली आहे. तेथे एसआयटी चौकशी सुरू असल्याने प्रशासनाने राजकीय नेते आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना तिकडे जाण्यास अनुमती दिली नव्हती अशी सारवासारव आता प्रशासनाकडून केली जात आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबाला दडवून ठेवले असून त्यांना प्रसार माध्यमांशी बोलण्यास अनुमती दिली जात नसल्याचाही आरोप केला जात आहे, त्याचा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी इन्कार केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनेच एसआयटी स्थापन केली असून त्यांना येत्या 14 ऑक्टोबरपर्यंत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.