नगर -करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सर्वत्रच लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे नगर शहरातील गेल्या 50 दिवसापासून छोटे-मोठे व्यावसाय बंद आहेत. या व्यवसायावर अनेक कुटुंब तसेच नोकरदार वर्ग अवलंबून असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी शहरातील अटीशर्तीवर व्यवसाय सुरु करण्यासाठी टप्याटप्याने महापालिकेने परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी आयुक्त श्रीकांत मायकलार यांच्याकडे केली आहे. यावेळी विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, नगरसेवक अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, विनीत पाऊलबुद्धे, सुनील त्रिंबके, कुमारसिंग वाकळे, अजिंक्य बोरकर डॉ. सागर बोरुडे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, संजय ढोणे, सतीश शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी शहरातील करोना संदर्भातील माहिती आयुक्त यांच्याकडून घेतली.