लाखनगाव- पारगाव दत्तात्रयनगर ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने साडेसहा हजार ऊस तोडणी मजुरांना सुमारे 25 लाख रुपये किमतीचे किराणा व भाजीपाला सामान आज पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे,कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, संचालक प्रदिप वळसे पाटील, तहसीलदार रमा जोशी, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे घोडेगाव पोलीस निरीक्षक प्रदीप पवार कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, रामनाथ हिंगे यांच्या हस्ते आज वितरण करण्यात आले.
सध्या राज्यभरात कोरोनाची दहशत असल्यामुळे सर्वत्र संचारबंदी आहे .त्यामुळे भीमाशंकर सहकारी कारखाना परिसरातील सहा हजार ऊस तोडणी मजूर कारखाना स्थळावरच वास्तव्यास आहेस. बंदी मुळे त्यांना आपल्या गावाकडे जात येत नाही .त्यामुळे या उसतोडणी मजुरांना कारखान्याच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
सध्या या मजुरांना टायर बैलगाडीसाठी प्रत्येकी टायर बैलगाडीवरील कुटुंबासाठी बाजरी पाच किलो, तांदूळ दोन किलो ,साखर, मुगडाळ ,तेल ,मीठ ,कांदा, बटाटा फ्लॉवर ,कोबी ,मिरची प्रत्येकी एक किलो .तर शेंगदाणे अर्धा किलो तर मिरची पावडर कांदा लसूण पावडर कांदा लसूण मसाला 50 ग्रॅम,एक साबण याप्रमाणे वाटप केले जात आहे. तर ट्रॅक्टर टायर गाडी साठी प्रत्येक कुटुंबातला बाजरी आठ किलो, तांदूळ दोन किलो, साखर डाळ,प्रत्येकी दीड किलो, तेल मीठ ,एक किलो, शेंगदाणे अर्धा किलो ,कांदा ,बटाटा, फ्लॉवर कोबी ,मिरची एक किलो ,तर मिरची पावडर,कांदा लसूण मसाला शंभर ग्रॅम,एक संतूर साबण याचे वाटप केले जात आहे.
सध्या शासनाच्या वतीने नागरिकांना आहे त्या ठिकाणी राहण्याचे आदेश दिले असल्याने राज्यभरातील अनेक साखर कारखान्यांवर उसतोडणी साठी आलेले मजुर अडकून पडले असल्याचे पाहावयास मिळत आहे.