मंचर – येथील मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने मंचर एसटी बसस्थानकाच्या कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच दत्ता गांजाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. करोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने मंचर आणि अन्य भागातिल महाराष्ट्र राज्य परिवहन कर्मचारी यांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच दत्ता गांजाळे, कल्पेश बाणखेले, अमोल बाणखेले, अमोल क्षीरसागर, विजय जाधव, अमित बाणखेले, अक्षय राजगुरू, माउली लोखंडे, वाहतूक नियंत्रक महमंद सय्यद उपस्थित होते.