Government Jobs : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ बँकेत निघाली तब्बल 13 हजार पदांची भरती, लगेच करा अर्ज

SBI Clerk Vacancy 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे. एसबीआयने (SBI) 13 हजारांपेक्षा अधिक पदांची जाहिरात प्रकाशित केली आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या तरूणांसाठी नोकरीची ही चांगली संधी आहे. एसबीआय क्लॅरिकल कॅडरमध्ये ज्यूनिअर असोसिएट पदासाठी ही भरती करणार आहे. या भरतीच्या पात्रता, अर्ज प्रक्रिया व वयोमर्यादा याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
13735 जागांसाठी भरती
स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्यूनिअर असोसिएट (SBI Junior Associate Recruitment 2024) पदासाठी 13735 जागांची भरती सुरू केली आहे. यामध्ये 5870 अनारक्षित आहेत. तर 2118 पदे एससी, 1385 पदे एसटी, 3001 ओबीसी आणि 1361 ईडब्ल्यूएस वर्गासाठी आरक्षित आहेत.
पात्रता
मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. अंतिम वर्षातील उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करू शकतील. 20 ते 28 वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. उमेदवाराचा जन्म 2 एप्रिल 1996 च्या अगोदर आणि 1 एप्रिल 2004 च्या नंतर झालेला नसावा. तर एससी व एसटी वर्गातील उमेदवारांना वयामध्ये सूट मिळेल.
अर्ज करण्याची प्रक्रिया
या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 17 डिसेंबर 2024 ला सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जानेवारी 2025 आहे. प्रीलियम परीक्षेची अंदाजे तारीख फेब्रुवारी 2025, तर मुख्य परीक्षा मार्च/एप्रिल 2025 मध्ये पार पडेल. इच्छुक उमेदवार sbi.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
अर्ज शुल्क
या पदासाठी अर्ज करण्यासाठी सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना 750 रुपये शुल्क भरावे लागेल. तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना 17900 रुपये ते 47920 रुपयांपर्यंत पगार मिळेल. इच्छुक उमेदवार sbi.co.in या वेबसाइटवरून अधिक माहिती प्राप्त करू शकतात.





