AAI Recruitment : सरकारी नोकरीची संधी, महिन्याला 92 हजार रुपये पगार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

AAI Junior Assistant Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांसाठी खास संधी आहे. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने (AAI) ज्युनिअर असिस्टेंट पदांच्या 89 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीचे नॉटिफिकेशन जारी करण्यात आले असून, इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवार अधिकृत वेबसाइट aai.aero च्या माध्यमातून या पदासाठी अर्ज करू शकतील.
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडून जारी करण्यात आलेल्या या जागांसाठी 30 डिसेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार 28 जानेवारी 2025 पर्यंत या पदासाठी अर्ज करू शकतात.
ज्युनिअर असिस्टेंट पदासाठी कसे अर्ज करू शकता?
- या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइट aai.aero ला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर Recruitment पर्यायावर क्लिक करा.
- आता Airport Authority AAI Junior Assistant Fire Service Recruitment 2024 लिंकवर क्लिक करा.
- पुढे Apply Online वर जा.
- आता तुम्हाला नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
- नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या इतर माहितीसह अर्ज भरा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर शुल्क पावती व अर्जाची प्रिंट काढा.
अर्जाचे शुल्क
अर्ज करतानाच तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरावे लागेल. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गासाठी अर्जाचे शुल्क 100 रुपये आहे. तर अनुसुचित जाती/जमाती आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.
पात्रता
ज्युनिअर असिस्टेंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 10वी सह 3 वर्षांचा डिप्लोमा (मॅकेनिकल/ऑटोमोबाइल/फायर इंजिनिअरिंग) केलेला असणे आवश्यक आहे. याशिवाय, 12वी पास असल्यास अवजड वाहन चालक परवाना त्यांच्याकडे असावा. 18 ते 30 वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना 31 हजार ते 92 हजार रुपयांपर्यंत पगार मिळेल. अधिक माहितीसाठी तुम्ही aai.aero वेबसाइटला भेट देऊ शकता.





