रस्ते बांधणी कामात सर्व प्रकारच्या स्टील वापरास अनुमती – गडकरीByप्रभात वृत्तसेवाUpdated On:February 14, 2021, 10:20 pmनवी दिल्ली – केंद्र सरकारने राष्ट्रीय हमरस्ते बांधणीच्या कामात स्टील वापरावर काहीं निर्बंध लागू केले होते तथापि आता हे सर्व निर्बंध उठवण्यात आले असून या कामात सर्वच प्रकारच्या स्टील वापरला अनुमती देण्यात आली आहे. या आधी रस्ते बांधणीचे कंत्राट देताना या कामासाठी प्रायमरी किंवा इंटीग्रेटेट स्टील उत्पादकांकडूनच घेतलेले स्टील वापरण्याची अट होती. रस्ते बांधणीचा खर्च कमी असावा म्हणून ही अट घालण्यात आली होती. आता कोणत्याही प्रकारच्या पोलादाचा वापर रस्ते बांधणीसाठी करता येणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे बोलताना दिली. ते म्हणाले की आम्ही स्टील वापराच्या संबंधात काही निर्बंध घातले होते पण ते आता मागे घेण्यात आले असले तरी रस्ते बांधणीच्या कामात दर्जेदार स्टीलच वापरले जावे ही अपेक्षा मात्र कायम राहणार आहे. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टीलचा दर्जा मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमधून तपासून घ्यावा लागणार आहे. गडकरी म्हणाले की सरकारच्या निर्णयामुळे स्टील उत्पादकांमध्ये स्टील पुरवठ्यासाठी स्पर्धा वाढेल आणि त्यातून रस्ते बांधणीसाठी स्वस्तात स्टील उपलब्ध होऊ शकले असा आमचा विश्वास आहे. टॅग्स:#All Types Of Steel#Allowed In Road Construction#Gadkari
मिस्त्री यांच्या निधनानंतर गडकरींचा मोठा निर्णय, कारमधील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास दंड