मुंबई : महाराष्ट्र सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत नवीन परिपत्रक जारी केले असून यात उद्यापासून सर्व ग्रंथालये व टप्याटप्याने मुंबईतील मेट्रो सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
राज्यात काही दिवसांपासून ग्रंथालये, मेट्रो, आठवडी बाजार सुरू करावेत यासाठी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेत राज्यातील सर्व ग्रंथालये उद्यापासून (15 ऑक्टोंबर) सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तसेच टप्याटप्याने मुंबईतील मेट्रो सेवा सुरू करण्यासही सरकारने परवानगी दिली आहे. मेट्रो सेवा सुरू करण्याबाबतची SOP लवकरच
नगरविकास विभागाकडून जारी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकार के '#BeginAgain' दिशानिर्देशों के तहत सरकारी और निजी पुस्तकालयों को खोलने की अनुमति दी जाएगी, साप्ताहिक बाज़ारों को चलाया जा सकता है और व्यापार प्रदर्शनियों को भी अनुमति दी गई है। https://t.co/V2aZf3zhuw
— ANI_HindiNews (@AHindinews) October 14, 2020
तसेच कंटनेन्मेंट झोनबाहेरील आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.