बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे ‘अखिल भारतीय हिंदी परिसंवाद’

पुणे – बँक ऑफ महाराष्ट्राने सर्व बँका, वित्तीय संस्था व विमा कंपन्यांसाठी भविष्यातील बँकिंग या विषयावर नवी दिल्ली येथे एक अखिल भारतीय परिसंवाद आयोजित केला. सरकारच्या गृह मंत्रालयातील राजभाषा विभागाच्या सचिव अंशुली आर्य या परिसंवादाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. (All India Hindi Seminar organized by Bank of Maharashtra)
बँकेचे कार्यकारी संचालक आशिष पांडे, हे अध्यक्षपदी होते. बँकेच्या सरव्यवस्थापिका चित्रा दातार,राजभाषा व मनुष्यबळ विभागाचे सरव्यवस्थापक श्री के राजेश कुमार, दिल्ली विभागाचे विभागीय व्यवस्थापक हरीशंकर वत्स आणि राजभाषा विभागाचे उपसरव्यवस्थापक डॉक्टर राजेंद्र श्रीवास्तव हे परिसंवादात प्रामुख्याने उपस्थित होते.
वित्त सेवा विभागातील संचालक जगजीत कुमार आणि उपसंचालक धरमबीर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. सद्य परिस्थितीत बँकिंग व्यवसायात हिंदी व प्रादेशिक भाषांचा उपयोग अतिशय महत्वाचा असून त्यामुळे दुर्गम भागातील ग्राहकांना देखील याचा लाभ होईल असे प्रतिपादन अंशुली आर्य यांनी केले. बँक ऑफ महाराष्ट्र व अन्य संस्थांनी या दिशेने केलेल्या व करीत असलेल्या प्रयत्नांचे देखील श्रीमती अंशुली आर्य यांनी कौतुक केले.
के राजेश कुमार यांनी सर्व सहभागी व्यक्तींचे स्वागत केले. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी महाबँक प्रगती या अंतर्गत मासिकाचा व त्याच्या ब्रेल लिपीतील आवृत्तीचे प्रकाशन केले. ऑफ महाराष्ट्राने आयोजित केलेल्या अखिल भारतीय हिंदी निबंध स्पर्धेतील विजेत्यांना या प्रसंगी पारितोषके देण्यात आली.
आशिष पांडे यांनी येत्या काळातील बँकिंगचे भविष्य जाणून घेणे औत्सुक्याचे ठरेल असे सांगितले. परंपरागत बँकिंग पासून आज आम्ही इंटरनेट, मोबाईल बँकिंग आणि संभाषणात्मक बँकिंग पर्यत आम्ही आज पोहोचलो असल्याचे ते म्हणाले.
बाजारपेठेच्या आणि नवीन पिढीतील ग्राहकांच्या अपेक्षांनुसार बँका व वित्तीय संस्थांनी कृत्रिम प्रज्ञा, सामुहिक संगणन, इत्यादी सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन पांडे यांनी केले. आपल्या योजना आणि संकल्पना दूरस्थ व दुर्गम भागात प्रसारित करण्यासाठी हिंदी व प्रादेशिक भाषा हे सशक्त मध्यम दिल्ली विभागाचे विभागीय व्यवस्थापक हरीशंकर वत्स यांनी आभार प्रदर्शन केले.



