स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाई : अंधाराचा फायदा घेत दोघे फरार
नगर – नगर-पुणे बायपास जवळ सोनेवाडी-अकोळनेर रस्त्याजवळ दरोड्याच्या तयारीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तलवार, दोन लाकडी दांडके, सात मोबाईल असा एकूण 67 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गणेश दिनकर झिंजूर्डे (वय-27, रा. भगवाननगर, पाथर्डी), संजय आण्णा मोहीते (वय-21, रा. इंदीरानगर, पाथर्डी), महेंद्र सुरेश आरगडे (वय-25, रा. माणिकदौंडी रोड, इंदीरानगर, पाथर्डी), नेवीन संजय माने (वय-20, रा. कासार पिंपळगांव, ता. पाथर्डी) ही अटक केलेल्यांची नावे आहेत. तर शौकत दिलावर शेख (रा. इंदीरानगर, पाथर्डी), अमोल धोत्रे (रा. पाथर्डी) हे दोघे पळून गेले आहेत.
पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदाराकडून नगर ते अकोळनेर-सोनेवाडी जाणारे रोडवर बायपास चौकाचे पुढे असलेल्या नाल्याजवळ पाच ते सहाजन एका निळ्या रंगाचे कारमध्ये कोठेतरी दरोडा टाकण्याचे उद्देशाने संशईतरित्या दबा धरुन बसलेले असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार गणेश इंगळे, सोन्याबापू नानेकर, दत्तात्रय गव्हाणे, सुनिल चव्हाण, मनोहर गोसावी, दत्तात्रय हिंगडे, रविंद्र कर्डीले, विश्वास बेरड, सागर सुलाने, सुरज वाबळे, आण्णा पवार, विजय ठोंबरे व चालक बाळासाहेब भोपळे यांच्या पथकाने चार जणांची पंचासमक्ष झडती घेतली. त्यांच्याकडून एक लोखंडी तलवार, दोन लाकडी दांडके, एक नायलॉन दोरी, एक कार नं. (एम.एच-12-डीएस-7503) व वेगवेगळ्या कंपनीचे 7 मोबाईल असा माल जप्त करण्यात आला.