IPL 2024 : प्लेऑफचे चार संघ झाले निश्चित..! अशा रंगतील लढती, जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक….

IPL 2024 Playoffs : आयपीएल स्पर्धेतील लीग टप्प्यातीलराजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आले असले तरी संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला. वास्तविक, आता राजस्थान रॉयल्सला एलिमिनेटर सामना खेळावा लागणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादचे 17-17 गुण असले तरी चांगल्या नेट रनरेटमुळे सनरायझर्स हैदराबाद नंबर-2 वर पोहचले, तर राजस्थान रॉयल्सला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. राजस्थान रॉयल्सने रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध विजय मिळवला असता, तर ते दुसऱ्या स्थानावर राहिले असते.
आता यासह प्लेऑफचे चार संघ निश्चित झाले आहेत. केकेआर, एसआरएच, राजस्थान रॉयल्स आणि आरसीबीचे संघ प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. आयपीएल 2024 ची लढाई अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आता लीग टप्पा संपला असून आता प्लेऑफचे सामने होणार आहेत.
या संघांमध्ये होणार पहिला क्वालिफायर सामना…
आयपीएल 2024 च्या पॉइंट टेबलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघ पहिल्या स्थानावर आहे. संघाचे 20 गुण आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघ 17 गुणासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता पहिल्या क्वालिफायरमध्ये केकेआर संघाचा सामना हैदराबाद संघाशी होणार आहे.
Next Stop 👉 Ahmedabad! ✈️
𝗤𝘂𝗮𝗹𝗶𝗳𝗶𝗲𝗿 𝟭 calling 💜🧡
Kolkata Knight Riders 🆚 Sunrisers Hyderabad#TATAIPL | #KKRvSRH | #Qualifier1 | @KKRiders | @SunRisers pic.twitter.com/NvGURFEmnz
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2024
हा सामना 21 मे रोजी अहमदाबादच्या मैदानावर होणार आहे. जो संघ पहिला क्वालिफायर जिंकेल तो थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. तर या सामन्यातील पराभूत संघाला आणखी एक संधी मिळेल. म्हणजेच, पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघांना अंतिम फेरीत पोहोचण्याच्या 2 संधी मिळतील.
एलिमिनेटरमध्ये आरसीबी या संघाशी करेल सामना
राजस्थान रॉयल्स संघ 17 गुणासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबीचा संघ 14 गुणासह चौथ्या क्रमांकावर आहे. या दोन संघांमधील एलिमिनेटर सामना 22 मे रोजी अहमदाबादच्या मैदानावर होणार आहे. या सामन्यात जो संघ हरेल. त्याचा आयपीएल 2024 मधील प्रवास संपणार आहे.
Eliminator 🆚 RR 🔐
The Royal Battle awaits! 🫡#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 #RRvRCB pic.twitter.com/S7byIuQoJl
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 19, 2024
यानंतर एलिमिनेटरचा विजेता संघ आणि क्वालिफायर-1 मधील पराभूत संघ क्वालिफायर-2 मध्ये आमने-सामने येतील. त्यानंतर 26 मे रोजी क्वालिफायर-1 आणि क्वालिफायर-2 मधील विजेत्या संघांमध्ये चेपॉक येथे अंतिम सामना खेळवला जाईल.
आयपीएल 2024 प्लेऑफ वेळापत्रक :
क्वालिफायर-1 : कोलकाता विरुद्ध हैदराबाद, 21 मे, अहमदाबाद.
एलिमिनेटर : राजस्थान विरुद्ध आरसीबी 22 मे ,अहमदाबाद
क्वालिफायर 2 : क्वालिफायर 1 पराभूत विरूध्द एलिमिनेटर विजेता 24 मे, चेन्नई
फायनल – क्वालिफायर-1 विजेता विरूध्द क्वालिफायर-2 विजेता 26 मे,
एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई.





