मुंबई- ‘आई माझी काळू बाई’ या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड बाहेर पडली आहे. प्राजक्ताला तिच्या चुकीच्या वागण्यामुळे मालिकेतून काढलं आहे, असं मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल- आठल्ये यांनी सांगितलं. त्यांनी या सगळ्या प्रकाराबाबत अलका कुबल यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलखतीत संविस्तर सांगितलं आहे.
प्राजक्ता गायकवाड ही सेटवर अत्यंत वाईट वागायची. तिला भान नसायचं. कोरोनाच्या काळात आमच्या सेटवर काहींना बाधा झाली होती. त्यात तिने माणूसकी दाखवली नाही. सेटवरील बाकी सगळ्यांशी ती वाईट वागायची. शरद पोंक्षे यांनी अनेकदा माझाकडे तिच्याबाबत तक्रार केली मात्र मी त्याकडे दुर्लक्ष केलं, असं अलका कुबल म्हणाल्या,
ती 20 वर्षाची आहे. सेटवर सगळे तिच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे होते. त्यांचा मान सन्मान तर नाहीच मात्र सगळ्यात उशीरा सेटवर यायची. त्यात ती अनेकदा खोटं बोलून सेटवरुन सुट्टी घ्यायची. आशाताई गेल्या तेव्हा तिने साधी विचारपूसही केली नाही, असंही त्यांनी सांगितलं.
तिला कशाचीच लाज वाटायची नाही. त्यात तिची आईसुद्धा सेटवर असायची. मध्येच काही बोलायची. मी, दिग्दर्शकांनी, चॅनेलवाल्यांनी तिला अनेकदा समजून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ती समजूतीच्या बाहेर होती, असं म्हणत अलका कुबल प्राजक्तावर भडकल्या.