मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचे संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले असून, आलिया भट्टच्या आगामी ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाचे ऑफिशल पोस्टर रिलीज झाले आहे. या चित्रपटात आलीय लीड रोल मध्ये असणारा आहे. भन्साळी यांच्यासोबत आलीयाचा हा पहिलाच चित्रपट आहे.
दरम्यान, या भूमिकेसाठी प्रियांका चोप्रालाही कास्ट करण्यात येणार होते. परंतु भंसाली यांना या भूमिकेसाठी राणी मुखर्जी ही सर्वप्रथम पसंती होती. परंतु राणीसोबत न जुळल्याने त्यांनी प्रियांकाशी चर्चा केली होती.
#AliaBhatt and Sanjay Leela Bhansali collaborate for the first time… First look posters of #GangubaiKathiawadi… Produced by Sanjay Leela Bhansali and Jayantilal Gada… 11 Sept 2020 release. pic.twitter.com/REYMZZbNQ9
— taran adarsh (@taran_adarsh) January 15, 2020
एफ हुसेन जैदी यांचा माफिया क्वीन ऑफ मुंबई या कादंबरीवरून हा चित्रपट तयार केला जात असून ही एक सत्यघटना आहे. कामाठीपुऱ्यात एकेकाळी जिचा वचक होता अश्या एका कोठीवालीची ही कथा आहे. गुजराथच्या काठियावाड प्रांतातील एका सधन घरातील ही मुलगी. १६ व्या वर्षी ती घरी काम करणाऱ्या अकौंटंच्या प्रेमात पडली. तिला हिरोईन व्हायचे होते.
या माणसाने तिला लग्नाचे वचन देऊन मुंबईत आणले आणि ५०० रुपयात विकून टाकले. वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेल्या या मुलीने कोठीवाली बनून अनेक सेक्सवर्कर आणि अनाथ मुलांसाठी मोठे काम केले. मर्जीविरुद्ध या व्यवसायात आलेल्या मुलींची तिने सुटका केली.
त्यावेळचा माफिया करीमलाला याच्या एका चेल्याने गंगूबाईवर रेप केला तेव्हा तिने करीमकडे इन्साफ मागितला आणि त्याने तिला बहिण मानले तेव्हा तिने करीमला राखी बांधली. करीमशी हे नाते जुळल्याने संपूर्ण कामाठीपुरा तिच्या ताब्यात आला होता अशी ही कथा आहे.