‘हार्ट ऑफ स्टोन’ मध्ये ऍक्शन सिक्वेन्स करताना दिसणार आलिया

मुंबई : कमी वयातच आपली अभिनयाची चुणूक दाखवत अभिनेत्री आलिया भट ने तिचा एक वेगळाच फॅन फॉलोईंग तयार केला आहे. आलिया आणि रणबीर यांच्या ब्रम्हास्त्र चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. जबरदस्त ट्रेलर नंतर आता चाहत्यांना या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा आहे.
View this post on Instagram
बॉलिवूड गाजवत असलेली आलीया आता लवकरच हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’ मधून आलिया डेब्यू करणार आहे. शिवाय या चित्रपटात ती ऍक्शन सिक्वेन्स करताना दिसण्याची शक्यता आहे. आलिया मागच्याच महिन्यात हार्ट ऑफ स्टोन’ च्या चित्रीकरणासाठी लंडन ला रवाना झाली आहे. ती हॉलिवूड मध्ये पदार्पण करीत असताना नर्व्हस असल्याचेही तिने आपल्या एका इंस्टाग्राम पोस्ट मधून सांगितले होते. ‘हार्ट ऑफ स्टोन’ मध्ये आलिया गेल गैडोट आणि जेमी डोर्णन सोबत मुख्य भूमिका साकार करताना दिसणार आहे. आलियाच्या हॉलिवूड डेब्यूबाबतची माहिती मार्च 2022 महिन्यात नेटफ्लिक्स इंडियाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डल वरून देण्यात आली होती.




