Alia Bhatt and Sharvari : अभिनेत्री आलिया भट आणि शर्वरी वाघ लवकरच ‘अल्फा’ या चित्रपटातून एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाविषयी एक अपडेट समोर आली आहे. या चित्रपटातील एक गाण या दोन्ही अभिनेत्रींवर चित्रित करण्यात येणार आहे. या गाण्यातून दोन्ही अभिनेत्रींची अनोखी शैली पाहायला मिळणार आहे. यश राज फिल्म्स यांचा अल्फा हा पहिलाच महिला प्रणित स्पाय युनिव्हर्स चित्रपट असणार आहे. ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आलिया भट आणि शर्वरी वाघ ‘अल्फा’ चित्रपटात एका गाण्यात दिसणार आहेत. हे गाण मोठ्या स्केलवर चित्रित करण्यात येणार आहे. या दोन्ही अभिनेत्रींचा एकत्र दमदार परफॅार्मन्स या गाण्यातून पाहायला मिळणार आहे. या गाण्यासाठी आलिया आणि शर्वरी एका नवीन शैलीत दिसणार आहेत, जी प्रेक्षकांनी आजपर्यंत पाहिलेली नाही. दोन्ही अभिनेत्री स्टुडिओमध्ये तासनतास गाण्याची रिहर्सल करत आहेत. मात्र, ते गाण कोणते असणार आहे, याची माहिती मिळालेली नाही. अल्फा हा चित्रपट एक अॅक्शनपॅक्ट चित्रपट असणार आहे. ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांव्यतिरिक्त, आलिया आणि शर्वरी देखील या गाण्याबद्दल खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात पहिल्यांदाच आलिया आणि शर्वरी एकत्र पाहायला मिळणार असल्याने चाहते उत्सुक झाले आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन शिव रवैल करत आहेत. आलिया आणि शर्वरी यांच्याव्यक्तिरिक्त अनिल कपूर, बॉबी देओल आणि हृतिक रोशन यांचे खास कॅमिओ चित्रपटात असणार आहेत. अल्फा हा चित्रपट या वर्षी ख्रिसमस वीकेंडला प्रदर्शित होणार आहे. हेही वाचा: अनन्या पांडेनी केली लिप सर्जरी? लेटेस्ट फोटो पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल