Alia Bhatt : तुंबाड 2 साठी आलियाने दोनच दिवसांत कळवला होकार; निर्माता सोहम शाहने सांगितला किस्सा
Alia Bhatt : अभिनेता आणि निर्माता सोहम शाह या चित्रपटावर काम करत असून, अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असल्याची माहिती समोर आली आहे.

How did Alia get cast in Tumbbad? : २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुबांड’ या हॉरर चित्रपटाने कोणत्याही मोठ्या स्टारच्या पाठबळाशिवाय प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडली. भय, रहस्य आणि थरार यांचा अनोखा संगम असलेल्या या चित्रपटाला कालांतराने मोठी लोकप्रियता मिळाली. आता या चित्रपटाचा सिक्वेल ‘तुबांड २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेता आणि निर्माता सोहम शाह या चित्रपटावर काम करत असून, अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या चित्रपटासाठी आलिया भट्टची निवड कशी झाली, याबाबत सोहम शाहने महत्त्वाचा खुलासा केला आहे.
अवघ्या दोन भेटींमध्ये आलियाने दिला होकार!
तुंबाड २ साठी आलियासारख्या लोकप्रिय अभिनेत्रीची निवड झाल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. अलीकडेच सोहम शाहने चित्रपटाच्या कास्टिंग प्रक्रियेविषयी सांगितले. आलियाला चित्रपटाची पटकथा ऐकवल्यानंतर तिने सकारात्मक प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, अवघ्या दोन भेटींमध्ये चित्रपटात काम करण्यासाठी तिने होकार कळवला.
सोहम शाहने आलियाचे कौतुक करताना सांगितले की, ती एक प्रामाणिक आणि व्यावसायिक अभिनेत्री आहे. अभिनयासोबतच तिला चित्रपट व्यवसायाचीही चांगली समज आहे. पहिल्या भेटीत आलियाने चित्रपटाबाबत काही महत्त्वाचे प्रश्न विचारले होते. तिच्या प्रश्नांवरून तिला कथेची आणि चित्रपटाच्या आशयाची सखोल समज असल्याचे जाणवले. आलियाला पटकथा ऐकवल्यानंतर आणि तिने ती वाचल्यानंतर काही दिवसांनी होकार कळवल्याचे सोहमने सांगितले
‘तुंबाड’ कधी होणार प्रदर्शित?
सध्या तुंबाड २ वर काम सुरू असून, अद्याप चित्रपटाची अधिकृत प्रदर्शनाची तारीख समोर आलेली नाही. मात्र, डिसेंबर २०२७ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस चित्रपटकर्मींचा आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेली लोकप्रियता पाहता दुसऱ्या भाग पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत. आता या चित्रपटात भय आणि रहस्याची कथा कोणत्या नव्या वळणावर जाणार, तसेच आलिया भट्टची भूमिका नेमकी कशी असेल, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Shashi Tharoor on PM Modi: जुनं ट्विट, नवा वाद! शशी थरूर यांनी मोदींना Gen-Z च्या मुद्द्यावरून घेरलं






