पुणे – अभिनेत्री आलिया भट्ट ही सोशल मीडियाचा भरपूर वापर करणाऱ्या बॉलिवूड स्टार्सपैकी एक मानली जाते. बऱ्याचदा ती चाहत्यांसह आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिने आता तिच्या ब्लॅक आउटफिटमध्ये एक ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
View this post on Instagram
आलियाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या ब्लॅक ड्रेसमध्ये ती खूप ग्लॅमरस दिसत आहे. केस खुले ठेवत दिलेली पोज चाहत्यांना खूपच आवडली आहे. या फोटोसह आलिया भट्टने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “कॅजुअल फ्लेक्सिंग’.
View this post on Instagram
आलियाने फोटो शेअर करताच अवघ्या एका तासातच 5 लाखांहून अधिक चाहत्यांनी फोटोला लाइक केले आहे. आलिया भट्ट सध्या रणबीर कपूरसोबत गोव्यात वेळ घालवत आहे. गोव्यातील एका फुटबॉल सामन्यादरम्यान तिला रणबीर कपूरसोबत स्पॉट करण्यात आले होते.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास आलिया भट्ट लवकरच “ब्रह्मास्त्र’ चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. यात रणबीर कपूर, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांनीही मुख्य भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय एसएस राजामौली यांच्या “आरआरआर’ चित्रपटात सध्या ती काम तरत आहे. तसेच “गंगूबाई काठियावाडी’, “तख्त’ आणि “शमशेरा’ चित्रटात ती झळकणार आहे.
View this post on Instagram