Alia Bhatt : आलिया भट्ट नव्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीस; ‘या’ अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रीन?
Alia Bhatt : आलिया भट्टने अभिषेक पाठक यांच्या नव्या चित्रपटासाठी तयारी सुरू केली

Alia Bhatt : ‘दृश्यम 2’ चे दिग्दर्शक अभिषेक पाठक यांच्या नव्या चित्रपटात लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. त्यांच्या या नव्या चित्रपटाचे शीर्षक देखील निश्चित झाले आहे. आलिया भट्टने अभिषेक पाठक यांच्यासोबत नव्या चित्रपटासाठी हातमिळवणी केली आहे.
एका रिपोर्टनुसार, या चित्रपटाचं शीर्षक ‘हाउसवाइफ’ असं सांगितलं जात आहे. या चित्रपटाची कथा एका विवाहित जोडप्याभोवती फिरणारी असेल. या चित्रपटात आलिया भट्टसह राजकुमार रावसोबत देखील चर्चा सुरू आहे.
राजकुमार राव यांनी या चित्रपटात काम करण्याची इच्छा दर्शवली आहे. समजा, यावर शिक्कामोर्तब झाला तर आलिया भट्ट आणि राजकुमार राव पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसतील. Alia Bhatt
आलिया भट्ट केवळ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार नाही, तर तिच्या इटरनल सनशाईन प्रोडक्शन्स या कंपनीअंतर्गत अभिषेक पाठक यांच्या पॅनोरामा स्टुडिओज सोबत मिळून या प्रोजेक्टची सह-निर्मितीही करणार आहे. सध्या अभिषेक पाठक अजय देवगणच्या फॅमिली थ्रिलर फ्रँचायझी ‘दृश्यम 3’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.
आलिया भट्टचे आगामी प्रोजेक्ट्स
शेवटचं आलिया भट्टला ‘जिगरा’ या चित्रपटात पाहण्यात आलं होतं. या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्स अंतर्गत करण्यात आली होती. दुसरीकडे, 2026 मध्ये आलिया भट्ट संजय लीला भन्साळी यांच्या रोमँटिक ड्रामा ‘लव्ह अँड वॉर’ मध्ये झळकणार आहे.
ज्यात रणबीर कपूर आणि विक्की कौशलही महत्त्वाच्या भूमिकेत असतील. याशिवाय, आलियाकडे ‘अल्फा’ हा चित्रपटही आहे, ज्यात ती बॉबी देओल आणि शरवरीसोबत दिसणार आहे. Alia Bhatt :
हेही वाचा:






