प्राध्यापक अली खान यांना मोठा दिलासा ; ‘ऑपरेशन सिंदूर’ पोस्ट प्रकरणी न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

Ali Khan granted interim bail। अशोका विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना ऑपरेशन सिंदूरवर सोशल मीडिया पोस्ट टाकल्याच्या प्रकरणी अंतरिम जामिनावर सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
अशा वेळी ‘ती’ पोस्ट करण्याची काय गरज होती ? Ali Khan granted interim bail।
आज प्राध्यापक अली खान यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यात आल. या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी प्राध्यापकांच्या पोस्टवर प्रश्न उपस्थित केला की अशा वेळी त्यांना अशी पोस्ट करण्याची काय गरज होती. मंगळवारी याआधी जिल्हा न्यायालयाने प्राध्यापकाला २७ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. ऑपरेशन सिंदूरवरील त्यांच्या पोस्टसाठी रविवारी त्यांना ताब्यात घेण्यात आले.
Supreme Court orders release of Ali Khan Mahmudabad, associate professor and head of the Political Science department at Ashoka University in Haryana, against his arrest over a social media post on Operation Sindoor. SC grants interim bail to Mahmudabad subject to furnishing of… pic.twitter.com/Ua9Kc6YyqU
— ANI (@ANI) May 21, 2025
अली खान यांच्या वतीने उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी खंडपीठासमोर आपला मुद्दा मांडला आणि सांगितले की, याचिकाकर्त्याचे म्हणणे पहा. त्यांनी सांगितले की ही एक सोशल मीडिया पोस्ट आहे. सिब्बल यांनी अली खानची सोशल मीडिया पोस्ट न्यायालयाला वाचून दाखवली.
आता हे सर्व सांगण्याची गरज होती का?’
न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी कपिल सिब्बल यांना विचारले की हा बातमीचा लेख आहे का? न्यायाधीशांनी प्रश्न केला की याचिकाकर्त्याने युद्धाच्या दुष्परिणामांबद्दल बोलताना राजकारणाबद्दल का बोलायला सुरुवात केली. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी विचारले, ‘आता हे सर्व सांगण्याची गरज होती का?’ जेव्हा देश संकटाविरुद्ध एकजूट झाला होता, तेव्हा हे सर्व करण्याची काय गरज होती? असा सवाल देवळील न्यायालयाने उपस्थित केला.





