Aleema Khan : पाकमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने इम्रान खान यांच्या भगिनी अलीमा खान (Aleema Khan)यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये पीटीआय पक्षाने केलेल्या आंदोलनाप्रकरणी हे वॉरंट बजावण्यात आले आहे. या आंदोलनाशी संबंधित खटल्याच्या सुनावणीसा अलीमा उपस्थित न राहिल्यामुळे न्यायालयाने हे वॉरंट बजावले आहे. या प्रकरणात सरकारविरुद्ध आंदोलन करणे, सरकारविरोधी घोषणा देणे, तोडफोड करणे आणि दगडफेक करणे असे आरोप आहेत. अलीमा व्यतिरिक्त, एटीसीने त्यांच्या दोन जामीनदारांविरुद्धही अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. सुनावणीला अमुस्थित राहण्याची परवानगी मागणारा अर्ज अलीमा यांनी दाखल केला होती. मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटळून अलीमा यांना कोणत्याही परिस्थितीत बुधवारी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले. अलीमाविरुद्ध वॉरंटची अंमलबजावणी करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल न्यायालयाने पोलीस अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीसही बजावली. अलीमा यांचे बँक खाते, राष्ट्रीय ओळखपत्र आणि पासपोर्ट रोखल्यामुळे त्यांना प्रवास करण्यास आणि दैनंदिन व्यवहार करण्यास अडचणी येत आहेत, असे सांगून त्यांच्या वकिलांनी एक दिवसाची सवलत मागितली होती. मात्र ११ वेळा अटक वॉरंट बजावूनही अलीमा यापुर्वी सुनावणीला अनुपस्थित राहिल्या असल्या होत्या. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मालमत्ता जप्तीचे आदेश दिल्यानंतर त्या पहिल्यांदा न्यायालयात हजर झाल्या होत्या.