Pune District : बेशिस्त वाहनांमुळे आळंदीकर त्रस्त

आळंदी : येथे नेहमीची वाहतूक कोंडी झाली आहे. त्याचबरोबर बेशिस्त वाहनचालक त्यांची अरेरावी, याचाही प्रत्यय आळंदीत येत असतो. मुळात चुकीच्या ठिकाणी वाहने लावून लोकांना त्रास, त्यात उर्मटपणाचे वागणे यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
मंदिराकडे जाणार्या आतील रस्त्यावरील सर्रास वाहने लावले तासंतास विना पार्किंग झोनमध्ये लावली जातात त्यामुळे वाहतूक कोंडी होते यामुळे येणार्या जाणार्यांना त्रास होतो. या ठिकाणी नो पार्किंग बोर्ड आहे तरीही वाहने उभी करून निघून जाणार्यांना आता चपराक बसणार आहे, दिघी आळंदी वाहतूक पोलीस यांनी टोइंग वाहने आणून गाड्या जप्त करायला सुरुवात केली आहे. प्रसंगी जामर लावून, जागेवर दंड नो पार्किंगला भरावा लागत आहे. यामुळे चुकीच्या ठिकाणी वाहने लावणार्यांना शिस्त लागेल यासाठी ही कारवाई सुरू आहे.
आळंदीत दर्शनाची गर्दी नित्यनेमाची असते, भाविक येतात मात्र वेळीअवेळी लागणार्या लग्नांमुळे आळंदीच्या वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यात लग्नाला येणारे सर्रास दर्शनाला जातात असे नाही. लग्न झाले की दर्शन न घेता निघून जाणारे काही महाभाग आहेत. मात्र त्यांच्या चुकीच्या लागलेल्या वाहनांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झालेले आहेत. लग्नाच्या निमित्त सांगून लावू नको अशा ठिकाणी गाडी लावून जातात.
आणि पोलिसांना निमंत्रित करा असा आदेशही देतात, असे महाभाग आपल्या चुकीच्या वागण्याने लोकांना त्रास होतो, याच भान ठेवत नाही. त्यावरच उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात जामर लावण्याची कारवाई सुरू आहे. त्याचबरोबर दिघी आळंदी पोलीस स्टेशन यांनी रोज कारवाई करून जादाकुमक जामर आणि टोइंग वाहन यांची मागणी करून घ्यावी आणि बेशिस्त वाहनचालकांना धडा शिकवावा अशी मागणी होत आहे.





