प्रभात वृत्तसेवा आळंदी – आळंदी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग ‘३ अ’ च्या नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आशा आशिष गोगावले निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून, प्रभागवासीयांसाठी त्या एक विश्वसनीय आणि अनुभवी पर्याय ठरत आहेत. गोगावले कुटुंबियांचा आळंदी नगरपरिषदेतील अनेक वर्षांचा प्रशासकीय अनुभव आणि जनसेवेची दीर्घ परंपरा त्यांच्या उमेदवारीला भक्कम आधार देत आहे. घरोघरी जाऊन त्या मदतारांच्या भेटी घेत आहेत. ज्येष्ठ नागरिकांचे आशिर्वाद आणि प्रभागात त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.आशा गोगावले यांच्या कुटुंबियांनी यापूर्वी केलेल्या कार्याचा ठसा आजही स्पष्टपणे दिसतो. आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या भव्य इमारतीसाठी त्यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आज हजारो नागरिकांसाठी आरोग्य सुविधांचा मोठा आधार बनला आहे. एवढेच नव्हे तर, शैक्षणिक क्षेत्रातही भरीव योगदान देत सीएसआर फंड मिळवून नगरपरिषद शाळा क्र. ३ च्या इमारतीचा वरचा मजला पूर्णत्वास नेला. यात्रा काळात भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी धर्मशाळांमध्ये शौचालयांचे बांधकाम करून त्यांनी धार्मिक आस्थेचा सन्मान केला. ‘स्वराज ग्रुप’च्या माध्यमातून नियमित रक्तदान शिबिरे आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपली आहे, तसेच आषाढी वारीत भाविकांना फराळ व पाणी वाटप करून त्यांनी आपली सेवावृत्ती सिद्ध केली आहे. महिला सक्षमीकरण, प्रभागाचा विकास हेच ध्येय येत्या काळात आशा गोगावले यांचा विशेष भर महिला सक्षमीकरण आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासावर असणार आहे. महिलांसाठी शिवणकाम, लघुउद्योग यांसारखी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे सुरू करणे आणि त्यांना स्वयंरोजगारासाठी आवश्यक अर्थसाहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध करून देणे. महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, कचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक उपाययोजना राबवून प्रभाग ‘स्वच्छ व सुंदर’ बनवणे, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्ट्रीट लाईट्स, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, प्रभागातील नागरिकांचे प्रश्न त्वरित सोडवण्यासाठी नियमित जनतेशी संवाद आणि प्रशासकीय कामात पारदर्शकता आणणे. प्रभागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित करणे, बालकांसाठी उद्यान, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र यांसह प्रभागात आवश्यक सर्व मूलभूत सुविधा उभारणे हा त्यांचा संकल्प आहे. योंगेद्र (आबा) कुऱ्हाडे यांची भक्कम साथ आशा गोगावले या प्रभाग ‘क्र.३ अ’मधून तर ‘ब’ मधून योगेंद्र (आबा) कुऱ्हाडे हे नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत आहेत. गोगावले यांच्याप्रमाणेच आबा कुऱ्हाडे यांच्या कुटुंबातील प्रशासकीय अनुभवाचा प्रभागातील नागरिकांना मोठा फायदा होईल, अशा अपेक्षेने त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. दोघांनीही जोरदार प्रचार करताना नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.