आळंदी: कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांकडून इंद्रायणीची स्वच्छता

Updated On:

आळंदी (ज्ञानेश्वर फड) – कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील महाराज मंडळी, वारकरी, भाविक यांनी इंद्रायणी नदी घाट परिसराची स्वच्छता केली . सकाळी सहा वाजतापासून साडेनऊ वाजेपर्यंत भाविकांनी इंद्रायणीतील कचरा बाहेर काढला. तसेच दर दशमीला इंद्रायणीची स्वच्छता करणार असल्याचे संदीप महाराज लोहार यांनी सांगितले.

याप्रसंगी भक्ती शक्ती संघाचे अध्यक्ष संदीप महाराज लोहर, दिगंबर महाराज नरवडे, संतोषानंद शास्त्री, संग्राम बापू महाराज भंडारे, अविनाश महाराज धनवे पाटील (सचिव भक्ती शक्ती संघ), गोट्याभाऊ भोलेराव, ओंकार महाराज वरकड, तुकाराम महाराज मुळीक, माऊली महाराज झाडे, किशोर महाराज धुमाळ व मित्र परिवार, स्वप्नील लोहर, अजय शेलार, ऋषिकेश कोंडे, ढाकणे महाराज, संतोष महाराज सुंबे, अमोल महाराज नवपुते, दत्ता महाराज ठाकरे, दोसोपंत स्वामी महाराज शिष्य, बळवंत आप्पा पांचाळ, तुकाराम पांचाळ, विठ्ठल आबा गव्हाणे, संजय घुंडरे पाटील, शुभम घुंडरे व मित्र परिवार, परमेश्वर वरकड, राम महाराज पैठणकर, वारकरी अर्बन बॅंकेतील पदाधिकारी, निवृत्ती महाराज झाडे, डाॅ. सचिन कुऱ्हे सर, राजू महाराज टकले, रवि महाराज वाव्हळ, संजय महाराज कावळे, योगेश महाराज मुळशीकर, लोणावळा मित्र परिवार, यांसह चाकण, भोसरी, पिंपरी परिसरातील भाविक स्वच्छतेसाठी उपस्थित होते. गंगागिरी केटरर्स यांच्याकडून नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली.

-इंद्रायणीचे पाणी प्रदुषीत; भाविकांमध्ये संताप

इंद्रायणीचे अपार महत्व आहे. सर्वच संत, ऋषी मुनी यांनी येथे स्नान केलेले आहे. यात्रेसाठी आळंदीला आलेल्या भाविकांची इंद्रायणीत स्नान आणि माऊलींचे दर्शन घेण्याची इच्छा असते. मात्र सध्या इंद्रायणीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदुषित झालेले आहे. इंद्रायणीमध्ये गटाराचे पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यात अंघोळ केल्याने अनेकांना त्वचारोग झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत. आम्ही इंद्रायणी घाट परिसराची स्वच्छता करू शकतो, पण पाणी शुद्ध करू शकत नाही. त्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून इंद्रायणीची स्वच्छता करावी, असे मत ह.भ.प. दिगंबर महाराज यांनी व्यक्त केले.

-माऊलींचा 725 वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात होणार

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याचे हे 725 वे वर्ष आहे. येत्या 27 नोव्हेंबरपासून आळंदी यात्रेला सुरुवात होणार आहे. 30 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी तर 2 डिसेंबरला माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आळंदी येथे खेड तालुका प्रांत, आळंदी देवस्थान समिती, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग यांची संयुक्त आढावा बैठक पार पडली. बैठकीतील चर्चेनूसार यावर्षी आळंदीची यात्रा मोठ्या उत्साहात होणार असल्याचे चित्र आहे. गेली दोन वर्ष करोनाच्या सावटामुळे भाविकांना यात्रेसाठी येता आले नाही मात्र सध्या करोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याने यावर्षी लाखों भाविक यात्रेसाठी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Pandharpur Wari 2021 : माऊलींच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम ठरला! यंदाच्या वर्षी 'असा' रंगणार आळंदी ते पंढरपूर वारी सोहळा - Marathi News | Pandharpur Wari 2021: Sant ...

आणखी संबंधित बातम्या

Alandi Crime : आळंदीत झोपण्याच्या जागेवरून वाद; लोखंडी सळईने मारहाण, तरुणाचा खून

2026-08-18 18:17:12

Alandi Crime : आळंदीत झोपण्याच्या जागेवरून वाद; लोखंडी सळईने मारहाण, तरुणाचा खून

Pune District : मेरीलँड विद्यापीठात वारीवरील प्रबंधाला जागतिक मान्यता

2026-07-21 07:47:33

Pune District : मेरीलँड विद्यापीठात वारीवरील प्रबंधाला जागतिक मान्यता

Pune District : लग्न जमवण्याच्या व्यवहारातून महिलेवर जीवघेणा हल्ला

2026-07-12 08:15:47

Pune District : लग्न जमवण्याच्या व्यवहारातून महिलेवर जीवघेणा हल्ला

Newasa News : ग्रंथराज ज्ञानेश्वरी आषाढी पालखी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान; माऊलींच्या कर्मभूमीत रंगला पहिला रिंगण सोहळा

2026-07-08 20:12:07

Newasa News : ग्रंथराज ज्ञानेश्वरी आषाढी पालखी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान; माऊलींच्या कर्मभूमीत रंगला पहिला रिंगण सोहळा

Pune News : येरवडा खुले कारागृह झाले विठ्ठलमय! 'राम कृष्ण हरी'च्या जयघोषात 'आषाढी वारी विशेष कीर्तन महोत्सव' संपन्न!

2026-07-06 21:48:23

Pune News : येरवडा खुले कारागृह झाले विठ्ठलमय! 'राम कृष्ण हरी'च्या जयघोषात 'आषाढी वारी विशेष कीर्तन महोत्सव' संपन्न!