आळंदी : वारकरी सेवा फाऊंडेशनतर्फे रूग्णवाहिकेचे लोकार्पण

आळंदी – वारकरी आणि नागरिकांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी सेवा फाउंडेशनकडून रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे आणि दिघी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनिल टोनपे यांच्या हस्ते रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

युवा उद्योजक महादेव अण्णा भोईर यांनी वारकरी सेवा फाऊंडेशनला रूग्णवाहिका समर्पण केली आहे. यावेळी भजनगंधर्व आदिनाथजी सटले गुरूजी, बंडोपंत महाराज खामकर, विठ्ठल आबा गव्हाणे, चंदू महाराज पांचाळ, महादेव सगळे यांनी भजनसंध्या सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ह.भ.प. मारोती महाराज कुऱ्हेकर बाबा यांनी आशिर्वाद दिले.

यावेळी वारकरी सेवा फाऊंडेशनचे पांडुरंग महाराज शितोळे, पंडीत महाराज क्षिरसागर, सोपान महाराज सानप, पृथ्वीराज बाबा जाधव, राजाभाऊ चोपदार, रामदास भोईर गुरुजी, नामदेव अप्पा चव्हाण, जालिंदर भाऊ भोसले, संग्राम बापू भंडारे, लक्ष्मण महाराज पाटील, प्रह्लाद महाराज टकले, संजय महाराज हिवराळे, गोविंद महाराज गोरे, अजय लोहेकर (पीएसआय) दत्ता महाराज यादव, प्रवीण महाराज लोळे, एकनाथ महाराज सांगोलकर, संदीप महाराज लोहर, संजय महाराज कावळे, अविनाश धनवे, रमेश केदारी, सचिन येळवंडे, अंकुश भोईर, ऍड नाझीम शेख, पत्रकार महादेव पाखरे, विलास काटे उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.