Alandi: आळंदीत भरदिवसा घरफोडी; पावणेचार लाखांचे दागिने लंपास
Updated On:

आळंदी – फ्लॅटच्या दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करत 143 ग्रॅम वजनाचे 3 लाख 86 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना आळंदी येथील पद्मावती रोडवरील प्रकाशमाला अपार्टमेंटमध्ये बुधवारी (दि. 28) दुपारी साडेबारा ते दोन वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलिस अधिक तपास करत आहेत.





