‘आला भावी आमदार’ची विदेशातही हवा ! Jaggu Ani Juliet च्या गाण्यावर थिरकला Ricky Pond पहा VIdeo

मुंबई – जग्गू आणि जुलिएट चित्रपटातील ‘भावी आमदार’ गाण्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं तरुणाईला चांगलीच भुरळ घालतंय. प्रदर्शित झाल्या झाल्या या गाण्याने अल्पावधीतच एक मिलयन व्हीव्हजचा टप्पा पार केला. एव्हडेच नाही तर परदेशातही भावी आमदार या गाण्याची हवा असल्याचे आता पाहायला मिळत आहे.
या गाण्यामध्ये अभिनेता उपेंद्र लिमये आणि अमेय वाघचा भन्नाट डान्स दिसून येत आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असून, प्रेक्षकांचा गाण्याला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.यासोबतच सोशल मीडियावरील अनेकजण यावर रिल्स बनवताना देखील दिसत आहेत.
प्रसिद्ध इनफ्युएनसर रिकी पॉण्डला देखील हे गाणं चांगलाच आवडलेलं दिसतंय. रिकेने भावी आमदार गाण्यावर केलेला डान्स सध्या तुफान व्हायरल होतोय. रिकेने फक्त या गाण्यावर ठेकाचं धरला नसून या गाण्यातील स्पेप्स देखील जशाच्या तश्या कॉपी करण्याचा प्रयत्न केलाय. झिंगाट नंतर पुन्हा एकदा अजय अतुलच्या भन्नाट संगीताची जादू विदेशात देखील चालताना पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
‘जग्गू आणि जुलिएट’ नावावरूनच हा चित्रपट काहीतरी हटके घेऊन येणार हे निश्चित झालं होत. त्यात ‘तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी’ या टॅगलाईनमुळे उत्कंठा आणखी वाढली होती. या चित्रपटामुळे अमेय-वैदेही ही जोडी ‘झोंबिवली’ या चित्रपटनानंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. 2008 मध्ये ‘यलो’ या चित्रपटाद्वारे सामाजिक भान असलेला विषय हाताळणारे महेश लिमये यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या 10 फेब्रुवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.





