अक्षय कुमारची होणार ‘स्त्री 3’मध्ये एन्ट्री? निर्मात्यांंनी अभिनेत्याच्या भूमिकेबद्दल दिली हिंट

Akshay Kumar | बॉलीवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारचे मागील काही चित्रपट अपयशी ठरले. दिवाळीत रिलीज झालेला त्याचा ‘सिंघम अगेन’ चित्रपट मात्र यशस्वी ठरला. यानंतर अक्षयने ‘स्त्री 2’ या चित्रपटात कॅमिओ देखील केला होता, जो प्रेक्षकांना खूप आवडला. 800 कोटींहून अधिक कमाई करून हा चित्रपट आतापर्यंत बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
या चित्रपटात अक्षयने सरकटाच्या वंशजाची भूमिका साकारली होती. यानंतर आता अक्षय ‘स्त्री 3’मध्ये दिसणार का असा सवाल केला जात आहे. यातच आता मॅडॉक फिल्म्सने नवीन चित्रपटांची घोषणा करत ‘स्त्री 3’ ऑगस्ट 2028 मध्ये प्रदर्शित होईल अशी माहिती दिली.
‘स्काय फोर्स’च्या ट्रेलर लॉंचवेळी अक्षय कुमारने दिनेश विजानसोबतचा त्याचा ‘दीड’ चित्रपट असे वर्णन केले. जेव्हा त्याला विचारण्यात आले की तो या हॉरर-कॉमेडी विश्वाचा एक भाग बनणार का? तर तो म्हणाला, ‘काय बोलू?’ हे निर्माते दिनेश विजान आणि ज्योती देशपांडे ठरवतील. ते पैसे गुंतवणार असून अमर कौशिक यांना दिग्दर्शन करायचे आहे. Akshay Kumar |
अक्षयचे बोलणे संपल्यावर दिनेशने त्याला दुजोरा दिला आणि म्हणाला, ‘नक्कीच, तो या विश्वाचा एक भाग आहे! तो आमचा थानोस आहे’. त्यामुळे आता अक्षय पुढील चित्रपटात पाहायला मिळणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. Akshay Kumar |
‘स्त्री 2’ गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रिलीज झाला होता. अमर कौशिक दिग्दर्शित, या चित्रपटात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर व्यतिरिक्त पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांच्याही मुख्य भूमिका होत्या.
हेही वाचा:





