Maharashtra Assembly Election 2024| राज्यात आज बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा तयार आहे. दिग्गज नेतेमंडळींसह अनेक सेलिब्रिटींनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. अभिनेता अक्षय कुमार, अली फझल, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, फरहान अख्तर, झोया अख्तर आणि राजकुमार राव यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
अभिनेता सुबोध भावे यांनी बजावला मतदान हक्क बजावला आहे. सुबोध भावाने नेहमी प्रमाणे सकाळीच मतदान केले आहे. सुबोधने कसबा येथे गुजराती प्रायमरी शाळेत मतदान केले आहे. राजकुमार रावनेही नागरिकांना मतदानाचेही आवाहन केले आहे.
राजकुमार राव म्हणाले, ‘लोकशाहीत हा आमचा हक्क आहे, त्यामुळे घराबाहेर पडून मतदान करणे खूप महत्त्वाचे आहे. मी माझी जबाबदारी पार पाडली आहे. आता तुम्हीची वेळ आहे’. राजकुमार राव मतदान करण्यासाठी ज्ञान केंद्र माध्यमिक विद्यालय मतदान केंद्रावर पोहोचला होता. दरम्यान, राज्यातील 288 विधानसभा जागांवर मतदान होणार असून शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे.
हेही वाचा :
“सत्तेसाठी तत्त्वाशी तडजोड करणारे…” म्हणत अमित शाह यांचे मतदारांना मतदानाचे आवाहन