“भूल भुलैया 2’मध्ये अक्षय कुमार?

प्रड्यूसर-डायरेक्‍टर अनीस बज्मी हे आपल्या सुपरहिट ठरलेल्या “भूल भुलैया’चा सीक्‍वल बनविण्याच्या तयारीत आहेत. अक्षय कुमार आणि विद्या बालन यांनी मुख्य भुमिका साकारलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले होते. आता या चित्रपटाच्या सीक्‍वलमध्ये मुख्य भूमिका कार्तिक आर्यन साकारु शकतो. तसेच अक्षयही या चित्रपटात काम करण्याची शक्‍यता आहे.
या चित्रपटात अक्षय कुमारला एक विशेष भूमिका साकारताना दिसणार आहे. मात्र, याबाबत अद्याप चित्रपट निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण अक्षय कुमार पुन्हा एकदा डॉक्‍टर आदित्य श्रीवास्तवच्या भूमिकेत झळकण्याची शक्‍यता आहे.
दरम्यान, अनीस बज्मी यांनी जॉन अब्राहम, अनिल कपूर आणि इलियाना डीक्रूज यांनी मुख्य भूमिका साकारलेल्या “पागलपंती’ चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण केले आहे. त्यानंतर आता या वर्षाअखेर “भूल भुलैया 2’चे शूटिंग सुरू होण्याची शक्‍यता आहे. या चित्रपटाला भूषण कुमार प्रड्यूस करणार आहेत.
अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास तो सध्या रोहित शेट्‌टीच्या “सूर्यवंशी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात त्याच्यासोबत कतरिना कैफ झळकणार आहे. यानंतर तो राघव लॉरेंस यांच्या “लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटातही काम करणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.